खेळ

कुणी केली स्फोट खेळी? कुणाचा वाजवला बँड??? वाचा संपूर्ण अपडेट

डबलिन : आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या वादळापुढे आयर्लंडचा संघ पालापाचोळ्यासारखा उडून गेला. भारताने यजमान आयर्लंडचा 76 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडला विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं, पण ते आयर्लंडला पेललं नाही.

सलामीला उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्यापासून आयर्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. 15 व्या षटकापर्यंत भारताने एकही गडी गमावला नव्हता. शेवटच्या पाच षटकांमध्ये भारताचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. 

भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 97 धावांची खेळी केली, तर शिखर धवनने 74 धावा करत त्याला चांगली साथ दिली. 

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडला भारतीय गोलंदाजांनी सावरुनच दिलं नाही. कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांनी आयर्लंडला एकामागोमाग एक धक्के दिले. कुलदीपने 4 तर यजुर्वेदने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. आयर्लंडला 9 बाद 132 धावा करता आल्या.