बॉडी बिल्डरसारखी बॉडी बनवणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं आहे. आता कुठं सगळीकडे कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये घट होताना दिसून येतं आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील परिस्थितीही आता व्यवस्थित होत चालली आहे. रूग्ण संख्याही आता कमी होत आहे.

कोरोना हा विषाणू आपल्या शरिरात शिरल्यानंतर डायरेक्ट तो आपल्या फुफुसांवर हल्ला करतो. या रोगाला सामोर जाण्यासाठी म्हणजेच त्याच्या सोबत लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती जास्त असणं आवश्यक आहे.

कोरोनाच्या काळामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी अनेक वेगवेगळे उपाय ट्राय केले असतील. त्यामध्ये कोणी औषध घेतली, कोणी प्राणायाम केलं तर कोणी काढा प्यायला. तसेच अनेकजणांना दररोज व्यायाम करण्याची सवय लागली.

आपल्याला माहित आहे की, काही लोकांना आपलं शरिर फिट ठेवायला फार आवडतं. ते त्यासाठी काहीही करू शकतात. काहीजण तर आपल्या शरिराला छानसा आकार येण्यासाठी डायटही फॉलो करतात. कोरोनाच्या काळापासून हे प्रमाण मुला-मुलींध्ये वाढलेलं दिसून येतं आहे.

तसेच आपल्याला हेही माहित असेल की, अनेक मुलांना बॉडीबिल्डसारखं शरिर बनवायचं असतं. त्यासाठी ते खुप जिममध्ये मेहनतही घेत असतात. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करून एका ठिकाणी बसला आहे. त्याला एक्सरसाईज केल्यामुळे खूप दम लागला असल्याचं त्याच्या बॉडी लॅंग्वेजवरून समजतं आहे. काही वेळ तो तसाच एका जिन्याच्या पायऱ्यावर बसून राहतो.

काही वेळानंतर त्याला छातीत दुखू लागतं. त्याला काय करावं हे कळत नाही. त्यानंतर तो उठायला जातो तर त्याचा तोल जातो आणि तो जमिनीवर कोसळतो. असं बोललं जात आहे की, त्या व्यक्तीने जिममध्ये हेवी एक्सरसाईज केली असल्यामुळे त्याच्या हृदयावर ताण येऊन त्याला हार्ट अटॅक आला असावा.

या व्हिडीओवरून एक लक्षात येते की, आपल्याला शक्य असेल आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शरिराला पेलवेल एवढीच एक्सरसाईज आपण केली पाहिजे. अतिप्रमाणात केली तर त्याचे आपल्या शरिरावर भलतेच परिणाम होऊ शकतात.

https://www.instagram.com/tv/CTRrigZl6Or/?utm_source=ig_embed&ig_rid=dab62476-f12f-4287-8314-7224c4d56beb

महत्वाच्या बातम्या-

भर मंडपात मेहुणीने असं काही केलं की नवरदेवाचा झाला पोपट, पाहा व्हिडीओ

ऐटीत मासे पकडायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

‘आता तो माझ्या आसपास नाही परंतु…’; ‘त्याच्या’ आठवणीत मलायकाला अश्रू अनावर

ट्विंकलने पोस्ट शेअर केली अन् राखी भावूक झाली, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

…म्हणून करीनाला सैफकडून नव्हे तर ‘अशा’ पद्धतीने मूल हवं होतं