बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण!

कोलकाता | बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. सौरव गांगुलीला कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

सौरव गांगुली याची रात्री उशिरा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणं सौरव गांगुली रुग्णालयात दाखल झाले आहेत.

सौरव गांगुली कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात दाखल झालेला आहे. गांगुली एका वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. गांगुली यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.

49 वर्षीय गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी त्यांना जानेवारी महिन्यात हार्ट हृदयविकाराच्या झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

गांगुलींवर त्यावेळी महिनाभरात दोनअँजियोप्लास्टी करण्यात आल्या होत्या. पहिल्या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले होते. दुसऱ्या अँजियोप्लास्टी स्टेनटिंगद्वारे उपचार करण्यात आले होते.

दरम्यान, सौरव गांगुली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल  झाले असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर 

मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“…तर राज्य सरकार राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतं” 

फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे, त्यामुळे…- नितीन गडकरी 

डाॅ. रवी गोडसे म्हणतात, “Omicron म्हणजे Nonsense”