मुंबई | अनेक अभिनेती, अभिनेत्री आपल्या इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर ज्याप्रकारे अॅक्टिव्ह असतात. त्याचप्रकारे ट्विटरवरही खूप अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये केवळ सुपरस्टार्स नसून सर्वसामान्य जनता असल्याचं दिसून येतं आहे.
तसेच प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा हे देखील आपल्या सोशल मीडियावर साईटवर खूप अॅक्टिव्ह असतात. अशातच त्यांना एक आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये एक मुलगा विटा वाहत असल्याचं दिसून येतं आहे. हा व्हिडीओ विट भट्टीवरचा असल्याचं समजतं आहे. या व्हिडीओमधील मुलगा एका विशिष्ट पद्धतीने त्या विटा आपल्या डोक्यावर असलेल्या लाकडी फळीवर ठेवत आहे. दुसरा मुलगा त्याच्या हातात एक-एक विट देत आहे आणि तो आपल्या डोक्यावर ठेवत आहे.
दोन-तीन थर झाल्यानंतर तो मुलगा विटा दोन्ही हातांनी वर फेकून आधीच्या विटेवर अचूकपणे ठेवत आहे. त्याचं हे कौशल्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी यासोबत एक कॅप्शनही लिहलं आहे.
त्यामध्ये त्यांनी त्या मुलाचं कौतुक केलं आहे. मजूरांचं कामं हे खूप आव्हानात्मक असतं. यासोबतच त्यांनी काही सवालही केले आहेत. या व्हिडीओमधील त्या मुलाला ज्याप्रकारे शरिर श्रम करावा लागत आहे. त्याप्रमाणे कोणालाही करावा लागू नये. हा व्हिडीओ कुठला आहे? कोणाला याबद्दल माहिती आहे का?, असे सवाल आनंद महिंद्रा यांनी केले आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ दीड लाख लोकांनी पाहिलं आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
चक्क नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरूण अन्…, पाहा व्हिडीओ
एकावं ते नवलंच! चक्क कुत्र्यानं केलं वृक्षारोपण, पाहा व्हायरल व्हिडीओ
तरूणांनी केलेल्या अपमानाचं आजोबांनी दिलं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ
आईस्क्रिम खाता-खाता बायकोने असं काही केलं की नवऱ्याचे डोळेच फिरले, पाहा व्हिडीओ