“पॉर्न वेबसाईट्स बंद केल्यामुळे मोदींचा पराभव”

मुंबई : ५ राज्यांमध्ये भाजपला जोरदार धक्का बसल्यानंतर सोशल मीडियामध्ये देखील भाजपची जोरदार खेचाखेची सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मोदी तसेच शहांची शेकडो मिम्स बनवून ती सोशल मीडियावर फिरवली जात आहेत. या मिम्सना नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. दिसलं मिम्स की लोक शेअर करत आहेत. यासोबतच नेटकऱ्यांनी भाजपच्या पराभवाचं विश्लेषण सुरु केलंय. कोणी मोदींना दोष देतंय, तर कोणी शहांना, मात्र यात आता एक नवीनच मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा मेसेज जोरदार व्हायरल झालेला पहायला मिळतोय. 

काय आहे हा मेसेज?

केंद्र शासनानं नुकत्याच पोर्न वेबसाईट्स बंद करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र शासनानं हा निर्णय घेतला. टेलिकॉम कंपन्यांना यासंदर्भात आदेश देण्यात आले. टेलिकॉम कंपन्यांपैकी काही कंपन्यांनी आपल्या सीमद्वारे होणारे इंटरनेटद्वारे पोर्न वेबसाईट्स पाहता येणार नाही याची तजवीज केली. जिओ, व्होडाफोन, आयडिया या कंपन्या यामध्ये आघाडीवर आहेत. त्यांनी सर्वात जास्त पोर्न वेबसाईट्स ब्लॉक केल्याचं सांगितलं जातं. काही कंपन्यांच्या सीमद्वारे मात्र अजूनही पोर्न वेबसाईट्स पाहता येत असल्याचंही समोर आलं आहे. 

दरम्यान, पोर्न वेबसाईट्स बंद करण्याच्या निर्णयावर देशभरात उलटसूलट चर्चा झाली. हा निर्णय बरोबर असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं, तसेच हा निर्णय चुकीचा आहे हे मानणारा एक वर्गही होता. यातील दुसऱ्या वर्गात तरुणांची संख्या जरा जास्त असल्याचं दिसतं. 

आता सोशल मीडियात जो मेसेज व्हायरल झाला आहे त्याचा संबंध सरकारच्या या निर्णयासोबत आहे. 

48385687 320171052162750 1917108079053242368 n 1

सर्व ५ राज्यात भाजपची पिछेहाट, करा अजून पॉर्न बंद… हाय लागली हाय… असा हा मेसेज आहे. असे फारच कमी ग्रुप असतील ज्या ग्रुपवर हा मेसेज फिरला नसेल. विनोदाचा भाग सोडला तर हा मेसेज गांभीर्यानं घ्यायचा की नाही, याचाही विचार व्हायला हवा.