आता आधार कार्डवरही लावता येणार आपल्या आवडीचा फोटो, वाचा सविस्तर

नवी दिल्ली |  आजकाल सगळ्यांनाच आपल प्रोफाईल चांगल करायचं असतं. आता या आधुनिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वापेक्षा त्या राहणीमानावरून पारखलं जातं.तसेच आजकाल फोटो काढायचा ट्रेंड सुरू झाला आहे.

फोटो शूट करून ते फोटो आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर पोस्ट करणे. त्याचप्रमाणे आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर असलेला फोटो चांगला असायला लागतो. आपण आपल्याला हवा तो फोटो तेथे ठेऊ शकतो. मात्र सरकारी ऑफिशल डॉक्युमेंचवरील आपण फोटो बदलू शकत नाही.

कोणीजर आपले आधार कार्ड पाहिले तर आपली त्यावेळी नाचक्कि होते. परंतू आता याचीही चिंता मिटली आहे. आता आपण आपल्याला हवा तो फोटो आपल्या आधार कार्डवर लावू शकतो. यासाठी आधार कार्ड बनवणारी भारतीय विशिष्ट ओळख प्ररिधान संस्था म्हणजेच UIDAI आपल्याला एक नवीन सेवा पुरवत आहे. आपण घरबसल्या आपला फोटो बदलू शकतो.

आपल्या आधार कार्डवर नवा, आपल्या आवडीचा फोटो अपलोड करण्यासाठी दोन पद्धतीने आपण ते करू शकतो.

पहिली पद्धत
– आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलण्यासाठी सर्वात आधी UIDAI पोर्टलवर जाऊन तेथे ‘Aadhaar Card Update Correction’ फॉर्मला डाऊनलोड करा.
– त्यानंतर दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा.
– UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नावाने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अर्ज लिहा. या अर्जासोबत तुम्हाला तुमचा नवा फोटो आणि आधार कार्डची प्रत जोडा. नंतर तो अर्ज UIDAI च्या कार्यालयात पोस्ट करा.

दुसरी पद्धत

– UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यानंतर नोदंणी फॉर्म डाऊनलोड करुन तो भरा.

– त्यानंतर जवळच्या कुठल्याही नोदंणी केंद्रावर (AEC) जाऊन हा फॉर्म तिथल्या आधार कार्डसंबंधी काम करणाऱ्या अधिकाऱ्याला द्या. या फॉर्मसोबत तुम्हाला बायोमेट्रिक तपशील मागितला जाईल. त्यानंतर अधिकारी तुमचा नवा फोटो घेईल. या प्रक्रियेसाठी तुम्हाला 25 रुपयांचे शुल्कही द्यावे लागेल. 25 रुपयांवर तुम्हाला जीएसटीही द्यावा लागेल.

– त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल. यामध्ये यूआरएन नंबर असेल. या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट झाले की नाही ते तपसू शकता. यानंतर काहीच दिवसांत तुम्हाला नव्या फोटोसह तुमचे आधार कार्ड मिळेल.

तुम्ही तुमचा फोटो ऑनलाईन बदलू शकत नाही. ऑनलाईन ही प्रक्रिया केवळ आधार कार्डवरील पत्ता बदण्यासाठी आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

महत्वाच्या बातम्या-

ज्येष्ठ नागरिकाचे ठुमके पाहून विरेंद्र सेहवाग म्हणतो…,…

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम! पहिल्याच सामन्यात भिडणार भारतीय…

डान्स करता-करता महिलेने चक्क स्टेजवर चेंज केला ड्रेस, पाहा…

‘या’ गावात कपडे न घालण्याची अनोखी पंरपरा,…

IPL 2021: पहिल्या सामन्याआधी विराट कोहलीचा चाहत्यांना खास…