ऐकावं ते नवलंच! चंद्रावर राहण्यासाठी वैज्ञानिकांनी बनवली मानवाच्या मूत्रापासून वीट; सविस्तर जाणून घ्या

नवी दिल्ली | विज्ञान आणि तंत्रज्ञानानं एवढी प्रगती केली आहे की माणूस चंद्रावर जावून राहण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. हीच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी भविष्याचा विचार करता वैज्ञानिकांनी चंद्रावर इमारत बांधण्याच्या दृष्टीने काही पाऊलं टाकली आहेत. चंद्रावर इमारत बांधण्यासाठीची काही तंत्र भारतीय वैज्ञानिकांनी शोधली आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंस  आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांनी मिळून ‘स्पेस ब्रिक’चा शोध लावला आहे. चंद्रावर इमारती बांधण्यासाठी या विटेचा वापर करण्यात येणार आहे. या विटेमध्ये मानवी मूत्र आणि लुनर सॉईलचा वापर करण्यात आल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.

वीट तयार करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी बॅक्टेरियाला लूनर सॉईलमध्ये मिसळलं. त्यानंतर या मिश्रणात युरिया आणि कॅल्शियमसह गवारीच्या बियांमधून निघालेला गम टाकण्यात आला. यानंतर काही दिवसातच ही वीट तयार झाली. एकदम मजबूत असणाऱ्या या विटेला हवा तास आकार देता येतो, असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.

वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीवरून 1 पाऊंड मटेरियल चंद्रावर घेऊन जाण्यासाठी 7.5 लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो. त्यामुळे शास्त्रज्ञ इमारतीसाठीच्या साहित्याचा कच्चा माल चंद्रावरील मातीमध्येच मिळेल का, याचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यपालांच्या ‘त्या’ मिश्किल वाक्यानंतर अजित पवारांचा राज्यपालांना दंडवत

कोथिंबिरीचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

कंगना रनौतनं उलगडलं बॉलीवूड इंडस्ट्री आणि उंडरवर्ल्ड मधील नात्याचं गूढ

अखेर उच्च न्यायालयाचा ग्रामपंचायत प्रशासकाबाबत मोठा निर्णय; राज्य सरकारला झटका!

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नरेंद्र मोदींनी देशवासियांसाठी लाल किल्ल्यावरून केल्या मोठ्या घोषणा