पुण्यातील सख्ख्या मावशीने पुतणीला वेश्या व्यवसाय कर म्हणत तिच्यासोबत केलं ‘हे’ संतापजनक कृत्य

पुणे | कोरोनाकाळात देशाच्या अनेक भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अशातच आता पुण्यातील कोंढवा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं आपल्याच पुतणीसमोर अश्लील वर्तन करत तिला वाईट मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला आहे.

कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका महिलेकडे तिच्या बहिणीच्या दोन मुली आणि एक मुलगा लॉकडाऊनमध्ये सुट्टीसाठी आले होते. ही महिला तिच्या प्रियकरासोबत राहत होती. मुलं सुट्टीवर आलेली असताना या महिलेनं मोठ्या मुलीला एक दिवस रूममध्ये बोलावलं आणि तिच्या समोर प्रियकरासोबत अश्लिल वर्तन करत मुलीचा विनयभंग केला. तसेच जर तू वेश्या व्यवसाय केला तर तुला खूप पैसे मिळतील, असंही सांगितलं.

मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर मुलीला जाऊ दिलं. मात्र, घडलेला प्रकार कोणास सांगितला तर आम्ही तुझ्या बहिणीला आणि भावाला ठार मारू अशी धमकी दिली. मुलगी आपल्या भावंडांसोबत घरी आल्यानंतर खूप शांत रहावू लागली. मुलीच्या आईनं मुलीला काय झालं विचारलं असता मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.

भवानी पेठेत राहणाऱ्या मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या मावशीविरिद्ध तक्रार दिली. मावशी व तिचा प्रियकराविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाची लस बाजारात आणणारं रशिया ठरलं पहिलं राष्ट्र!

48 तासात संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा…; सुशांतच्या भावाची राऊतांना नोटीस

‘सुशांतला हॉटेलमध्ये दिसलं होतं भूत…’; रियाने पोलिसांना सांगितली ‘त्या’ दिवशीची हॉटेलमधील कहानी!

“…म्हणून उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल”

मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर, चाहते चिंताग्रस्त