“10- 12 वर्षांपु्वी जन्माला आलेले आता राजकारणात चमकायला लागले असून ते आम्हाला अक्कल शिकवत आहेत”

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढवण्यासाठी काम केलं मात्र त्यांना त्या कामाचं योग्य असं फळ भेटलं नाही. भाजपमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीला आयारामांची संख्या वाढली मात्र इकडे पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते बॅकफूटवर गेलेले दिसलं. त्यामुळे नाराज खडसे नेहमी आपली नाराजी  जाहीरपणे बोलून दाखवतात.

भाजप पक्षात सर्वात जास्त अन्याय झालेल्या खडसेंनी अनेकवेळा आपली नाराजी व्यक्त करतात. आज खडसेंचा 68 वा वाढदिवस या निमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधत त्यांनी आपल्या भाषणातून स्वपक्षीयांवर निशाणा साधला.

गेल्या 10 ते 12 वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणत चमकू लागलेले आहेत. मात्र त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये असं म्हणत एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

मी एका गोष्टीचा विचार करत आहे की,निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का?, कोणत्या कारणासाठी?, याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

मी भाजपमध्ये गेले 40 वर्ष असून मी पक्षाशी एकनिष्ठ आहे मात्र पक्षाने माझयावर अन्याय केल्याची भावना आहे. माझे पाठीराखे आणि जनतेच्या मनात एक प्रकारचा संताप आहे. मात्र या संतापाचं कधी एकत्रीकरण होईल आणि त्याचा स्फो.ट होईल हे सांगता यते नसल्याचंही खडसे यांनी सांगितलं.

पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी अतिशय कष्ट घेऊन पक्ष उभारणी केली असल्याचं खडसे म्हणाले.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यांची भावना समजून घेणार असल्याचंही खडसेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘तुम्ही तुमच्या रक्ताचे नमुने ड्रग टेस्टसाठी द्या’; बॉलिवूडच्या या बड्या कलाकारांना कंगणाने केलं आवाहन

आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील टीव्ही9 चे पत्रकार पांडुरंग रायकर याचं निधन

येणारे 3 महिने धोक्याचे, राज्य सरकारने खबरदारी म्हणून घेतला मोठा निर्णय

एनसीबीची मोठी कारवाई; अखेर सुशांत प्रकरणातील पहिला आरोपी गजाआड

…म्हणून रियाच्या भावाला कधीही होऊ शकते अटक?; सुशांतच्या प्रकरणात अखेर रियाच्या भावाचं नाव आलं समोर!