‘या सरकारचं डोकं सरकलंय की काय?’; निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. राज्य सरकार कोरोना परस्थिती नुसार काही ठिकाणी नवे नियम लागू करत आहे, तर काही ठिकाणी नियमांमध्ये शिथिलता देत आहे. सरकारच्या सतत बदलणाऱ्या नियमांमुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम तयार होत आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून आता सरकारवर निशाणा साधला आहे.

एकिकडे राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्यांना 10 दिवसांचा क्वारंटाईन नियम लागू केला आहे आणि दुसरीकडे त्याच चाकारमान्याना मुंबईत परतण्यासाठी १४ दिवसांचा क्वारंटाईन नियम आहे. या सरकारचं डोकं सरकलंय कि काय?, अशा शब्दात निलेश राणेंनी सरकारवर घणाघात केला आहे.

गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकराने काही नवीन नियम लागू केले आहेत. गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्वारंटाईनचा कालावधी १४ दिवसांऐवजी 10 दिवसांचा केला आहे. तर तेच चाकरमानी मुंबईमध्ये पुन्हा आल्यानंतर क्वारंटाईन कालावधी 14 दिवसांचा केला आहे. सरकारच्या याच निर्णयावरून राणेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येवू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनांना कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश दिले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

पहिल्या नवऱ्याला एक कोटी तर दुसऱ्याला 45 लाखाचा गंडा घातला अन् परदेशात तिसऱ्या सोबतच तिचा संसार थाटला

अखेर ठरलं, T-20 विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर स्पर्धा होणार या वर्षी!

तुम्हाला मी खुपतो पण तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार; अविनाश जाधव आक्रमक

चांगली बातमी! अवघ्या ‘इतक्या’ रूपयात कोरोनाची लस होणार उपलब्ध!

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये भीषण अपघात; विमानाचे झाले दोन तुकडे