…तर मी स्वत: शिळफाट्यावर तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | मुंबईतील रस्त्यावरून अनेकदा विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मागच्या वर्षी आर. जे. मलिष्काने तर खड्यांवरून, ‘सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?’, या गाण्याची चाल लावत एक गाण बनवत मुंबई महापालिकेवर टीका केली होती. अशाचप्रकारे पण वेगळ्या शैलीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमधील करोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी या तिन्ही पालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे पालिका मुख्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीला मुख्यमंत्री ठाण्यात जाणार म्हणून त्या रस्त्यांचे सर्व खड्डे बुजावण्यात आले असल्याचं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. यावरून पाटलांनी एक ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो, असं राजू पाटलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झाला नसल्याने राज्य सरकारने अजुनही लोकलसेवा चालू केली नाही. मात्र आत्ता सर्व लोक घराबाहेर पडू लागली आहेत. सर्वसामान्य माणूस आणि हातावर पोट असणारी कुटूंब किती दिवस घरी बसणार? त्यामुळे नोकरदारवर्ग आपल्या कामावर जाऊ लागला आहे.

कामासाठी बाहेर पडलेले लोक लोकलसेवा बंद असल्याने सर्वजण बस, टॅक्सी, दुचाकी किंवा चारचाकी घेऊन कामावर जात आहेत. पनवेल, कर्जत, कसारा, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरपर्यंत या भागात जात आहेत. यामध्ये डोंबिवलीतील नागिरकांना शीळ-कल्याण- भिवंडी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र या ठिकाणी खड्डे असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी खरच एक सहज चक्कर मारावी, असं डोंबिवलीच्या नागरिकांनाही आमदार राजू पाटील यांच्याप्रमाणे वाटत असावं. कारण जर पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे जर रस्ते भरून तेथे चांगला रोड तयार होत असेल तर प्रत्येक नागरिकाला वाटेल की मुख्यमंत्र्यांनी आपल्या भागात फेरफटका मारावा.

 

महत्वाच्या बातम्या-

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कारोनाची लागण

“उनका ध्यान मोर पर है, बेरोजगारी के शोर पर नहीं”

…तोपर्यंत निर्बंध शिथील करता येणार नाहीत- मुख्यमंत्री उद्ध ठाकरे

“सुशांतचा मित्र संदीप सिंहच सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड”

‘…तर आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू’; कॉंग्रेस मंत्र्याचा धक्कादायक इशारा