पार्थ पवार काही भाजपमध्ये येत नाही आणि आम्हीपण काही घेत नाही- गिरीश बापट

पुणे | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र  पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं  होतं. यामध्ये पार्थ पवार भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र यावर भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी स्पष्टीकरण देत या चर्चांणा पुर्णविराम दिला आहे.

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही. त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. यामध्ये आम्हाला पडण्याची कोणतीही इच्छा नाही. त्यांनी कुटुंबात घरच्या घरी हा प्रश्न सोडवावा, असं  गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’ हा नारा दिला होता मग?, असा सवाल बापट यांना केला. यावर पार्थ पवार काही एकटाच जय श्रीराम म्हणत नसून सर्व जग जय श्रीराम म्हणतं असल्याचं बापट यांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवारांना जाहीरपणे फाटकारल्यामुळे अनेक चर्चा जोर धरू लागल्या होत्या. अजित पवांरांनीही यावर बोलायाला आधी नकार दिला होता. त्यामुळे त्यांची काय भूमिका काय असणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय टीममधील माजी क्रिकेटर आणि योगी आदित्यनाथ सरकारमधील ‘या’ मंत्र्याची जीवनयात्रा अखेर थांबली

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

‘कोरोनाकाळात आंदोलनं करताय तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत’; मुश्रीफ यांची विरोधकांवर खरमरीत टीका

‘जन्म झाला मुलाचा हातात सोपवली मुलगी’; पुण्यातील नामांकित रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

“कानून के हाथ लंबे होते है, वादा किया है तो निभाना पडेगा’, जमत नसेल तर राजीनामा द्या”