जलविष्काराची कमाल; तब्बल 100 हुन अधिक गावात पाणी साठवण

मुंबई | शेती विकासासाठी बाराही महिने पाण्याची गरज असते. महाराष्ट्रातील शेती 82% पाण्यावर अवलंबून आहे. शेतीला पुरेस पाणी न मिळाल्याने शेतात नासाडी होऊन  कित्येक शेतकऱ्यांनी पाण्याच्या समस्येमुळे आत्महत्या ही केली आहे. परंतु आता ही समस्या सुटणार आहे.

जल क्षेत्रात कार्यरत असलेल्या जलवर्धिनी प्रतिष्ठानने राज्यात 17 जिल्ह्यातील 45 तालुक्यात पाणी साठविण्याचे काम पूर्ण केलं आहे. तब्बल 100 पेक्षा जास्त गावात पाणी साठवण करण्यासाठी टाक्या बांधल्या आहेत. राज्य आणि राज्याबाहेरील 20 पेक्षा जास्त संस्थांना पाण्याची साठवण करण्याचे मार्गदर्शन केलं आहे. उत्तराखंड ,गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणामध्ये ही पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहे.

महाराष्ट्रात ऐकून 69 पाणी साठवण टाक्या बसविल्या आहे. गुहागर तालुक्यात 21 टाक्या लोकसहभागातून बांधल्या आहेत. कर्जत तालुक्यात लोकसहभागातून  47 टाक्या बसवल्या आहेत. रायगडमध्ये मोगरज गावात 9 पाणी साठवण टाक्या आदिवासी शेतकरी भागात बांधण्यात आल्या असून पिंगलास गावात 5 आदिवासी कुटुंबानी घराजवळ या टाक्या बांधल्या आहेत.ज्यात पावसाळ्यात घरावरील पाण्याचा साठा करता येईल.

जलवर्धनी प्रतिष्ठानचा वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा होईल असा अंदाज आहे. गावाने 10% भाग पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केल्यास त्या पाण्याने 90% भाग हा शेती साठी राहील व पाण्याची समस्या दूर होईल. घरच्या छतावरील पाणी साठवून वर्षभर घरातील 4 माणसांना पुरेल एवढे पाणी साचेल  याचा दावा जलवर्धनी प्रतिष्ठानने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कंगना राजकारणात जाणार का?, ट्रोलर्सच्या या प्रश्नावर अखेर कंगनानं सोडलं मौन; म्हणाली…

आत्मनिर्भर भारताचं पहिले यश; भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी

ऐकावं ते नवलंच! चंद्रावर राहण्यासाठी वैज्ञानिकांनी बनवली मानवाच्या मूत्रापासून वीट; सविस्तर जाणून घ्या

झेंडा मागे मग सल्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री, समोर साबीआय दिसली की काय?- निलेश राणे

आजी कर्णधाराने माजी कर्णधाराला दिल्या खास शुभेच्छा; विराट कोहली म्हणाला…