“उद्धव ठाकरे हे जनमतावर निवडून आलेले हे मुख्यमंत्री नसून जनतेचा विश्वासघात करुन झालेले मुख्यमंत्री”

मुंबई | सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एकेरीत उल्लेख केला होता. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून तीव्र निषेध व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि राऊतांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे हे जनमतावर निवडून आलेले हे मुख्यमंत्री नसून जनतेचा विश्वासघात करुन झालेले मुख्यमंत्री आहेत हे राऊतांनी लक्षात घ्यायला हवं आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, हे संजय राऊतांचं म्हणणं अत्यंत हास्यास्पदच असल्याचं भातखळकरांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांचा बाप काढणारे अर्णब गोस्वामी यांना सभ्य भाषेत बोलण्याचा उपदेश करतायत. मुख्यमंत्र्यांचा अपमान राज्याचा अपमान असेल तर पंतप्रधानांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान नव्हता काय?, काय म्हणावं याला ‘आपला तो बाब्या….’ की पेरावे ते उगवते?, अशा शब्दात भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर आणि राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत काय उत्तर देतात?, हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला सुरुंग थांबवण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे मोदी सरकारला तीन महत्वाचे सल्ले

संजय राऊत खोटारडे! उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून संजय राऊत खोटं बोलत आहेत; मामाचा खुलासा

“सुशांतसिंग राजपूतचा त्याच्याच कुत्र्याच्या बेल्टने गळा दाबून खून”

“जेव्हा जेव्हा देश भावुक झाला, तेव्हा तेव्हा महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्या”

मृत कोरोनाग्रस्ताला कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं; तृतीयपंथियांसह-नागरिकांनी घालून दिला आदर्श