Top news देश

‘धोनीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता त्याने 2024 ची लोकसभा निवडणुक लढवावी’; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य!

Dhoniii e1597577448457

नवी दिल्ली | काल 15 ऑगस्टला रात्री सातच्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंद धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र अशातच दुसऱ्याच दिवशी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीने लोकसभा लढवावी, असा सल्ला त्याला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

एम एस धोनीने फक्त क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बाकी इतर कशातून नाही. त्याच्यातील नेतृत्व करण्याचं कौशल्य त्यांने क्रिकेटमध्ये दाखवलं मात्र आता त्याने ते सार्वजनिक आयुष्यात दाखवण्याची गरज आहे त्यामुळे त्याने 2024 चा लोकसभा निवडणूक लढवयला हवी, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

धोनीने काल निवृत्ती घेतली आणि आज त्याला एकप्रकारे ऑफरच चालून आली आहे. परंतू धोनीने आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीररित्या पाठिंबा दिला नाही.

दरम्यान, धोनीची लोकप्रियता सगळीकडे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जर धोनी झारखंडमध्ये खासदारकीला उभा राहिला तर तो सहज निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र यावर अजून धोनीने कोण्तीही प्रतिक्रियी दिलेली नाही.

 

महत्वाच्या बातम्या-

ओवा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?; जाणून घ्या!

पवार कुटुंबातील ‘त्या’ वादावर अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“भारत कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसलाय”; मोदी सरकारला संजय राऊतांचा टोला

धोनीला कॅप्टन करताना मला खात्री होती की…; शरद पवारांनी केली खास फेसबूक पोस्ट!

जलविष्काराची कमाल; तब्बल 100 हुन अधिक गावात पाणी साठवण