‘या’ बाबतीत महाराष्ट्र मागासलेला का दाखवता?; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई | राज्यात सध्या मंदिर खुली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील मॉल्स चालू आहेत मात्र मंदिर उघडी नाहीत.  त्यासोबतच एस. टी. महामंडळाच्या बस आणि बेस्टही चालू नाहीत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील आंबेडकर भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते.

दिल्लीत केवळ मेट्रो बंद आहेत मात्र इतर सर्व वाहतूक चालू आहे तर उत्तर प्रदेश मध्येही वाहतूक सेवा चालू आहेत. मग या बाबतीत महाराष्ट्र मागासलेला का दाखवता?, लवकरात लवकर सार्वजनिक वाहतूक चालू करा आणि मंदिरही खुली करा नाहीतर पुन्हा आंदोलन करू, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

एसटी महामंडळ आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची एक बैठक आज घेण्यात आली होती. बेस्ट शंभर टक्के चालू आहे. ही बातमी खोटी आहे. ज्या लहान बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्या पूर्ण चालू आहेत. तर बेस्ट मालकीच्या केवळ 15 टक्के बस चालू आहेत. त्यामुळे बेस्टला तोटा होत आहे याचा खुलासा सरकारने करायला हवा असल्याची मागणीही आंबेडकरांनी केली आहे.

दरम्यान, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही एक दिवस गाड्या बाहेर काढण्यासाठी हजर रहा. एसटी गाड्या चालू नाही केल्या तर त्या एका ठिकाणी ठेवून बंद पडू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर घोषणा करावी, असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, समोर आला हा अहवाल….

पंडितजींच्या जाण्याने भारताच्या सांस्कृतिक विश्वात पोकळी निर्माण झाली- नरेंद्र मोदी

पद्मविभूषण प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचं निधन

रोहित पवार यांनी ‘या’ कारणावरून मानले नरेंद्र मोदींचे आभार

‘पवार कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे, सर्व काही सुरळीत होईल’; ‘या’ बड्या नेत्याचा विश्वास