भाजपला झाली लगीनघाई पण जोडीदारीण मिळेना, उद्यापासून लॉकडाऊन तोडा- प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद | भाजपला लग्न करण्याची घाई झाली पण त्यांना बायको भेटत नाही, असा टोला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला लगावला आहे. त्यासबोतच त्यांनी राज्य सरकारलाही धारेवर धरलं आहे.

1 तारखेपासून लॉकडाऊन पाळू नका, सर्व व्यवहार सुरु करा. शासनाचे लॉकडाऊन मान्य नका नका करू, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते. सत्तास्थापनेसाठी भाजपला जोडीदार हवा आहे, त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी ही मिश्किलपणे टीका केली आहे.

1 तारखेपासून सगळी दुकाने उघडी करा, रिक्षावाल्यांनी व्यवसाय सुरु करावेत, पब्लिक ट्रान्सपोर्टमधील लोकांनी कामावर हजर व्हावे. सरकारने 80 कोटी लोकांना अन्नधान्य दिल्याचा दावा केला, पण अन्नधान्य कुणालाही भेटलं नसल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरीत, अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या कृपेने 33 वर्ष परीक्षा देणारा विद्यार्थी अखेर झाला मॅट्रीक पास!

‘कोहलीला अटक करा’; उच्च न्यायालयात याचिका दाखल

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक कुटूंब नसून ते लिव्ह इन रिलेशनशिप- देवेंद्र फडणवीस

मैत्रीच्या नात्याला काळिमा! दारू पिताना झालेल्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून

आता धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे पण राज्य सरकारची तशी तयारी दिसत नाही- देवेंद्र फडणवीस