Top news मनोरंजन

‘लग्न करणार तर रामदेव बाबाशीच …’; ‘या’ आयटम गर्लने रामदेव बाबांना लग्नाची मागणी घातली

मुंबई | आयटम गर्ल म्हणून ओळख असलेली अभिनेत्री राखी सावंत नेहमीच विचित्र वागून आणि विचित्र बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते.  काहीही भान न ठेवता ती मीडियासमोर नको ते मत मांडत असते. अशातच राखीने रामदेव बाबांबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

लोकांच्या नजरेत येण्यासाठी तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी  राखीने सध्या रामदेव बाबांवर खूप प्रेम असल्याचं म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी जर मला लग्नाची मागणी घातली तर मी नक्कीच त्यांच्याशी लग्न करेन, असं राखीनं म्हटलं आहे.

रामदेव बाबांना राखीने हैराण केलं असून लग्न करण्यासाठी मागे लागली आहे, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. एका रियालिटी शोच्या दरम्यान राखीनं रामदेव बाबांना पाहिले असताच लग्नाची मागणी घातली होती.

दरम्यान, राखीच्या बोलण्याकडे लक्ष न देता दिल्ली मध्ये भरपूर  कुमार मुले आहेत, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. राखी खूप बेशरम मुलगी आहे, असंही रामदेव बाबा यांनी मध्यंतरी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

आजोबा आणि नातवाच्या वादावर रोहित पवार म्हणाले…

धक्कादायक! माहेरी रहात असलेल्या विवाहित भाचीवर सख्ख्या मामानेच केला बलात्कार अन् मग…

ऐकावं ते नवलच! मौसम देवी या महिलेनं दिला चार बाळांना जन्म

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं लवकरच शुभमंगल सावधान; ‘या’ व्यक्तिसोबत अडकणार विवाह बंधनात!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात, ट्विट करत दिली माहिती