पटना | अलिकडच्या काळात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अशातच आता बिहारमधील कटिहार जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आईच्या निधनानंतर मामाने विवाहित भाचीवर सतत बलात्कार केल्याने पीडीत महिला गरोदर राहिली. त्यामुळे पीडीतेच्या पतीने तिला स्विकारण्यास नकार दिला. कोणाचाच आधार न राहिल्यानं पीडीतेनं आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पीडीत महिलेच्या आईच्या निधनानंतर तिच्या आजोबांनी तिचा विवाह पुर्णिया जिल्ह्यातील एका व्यक्तीशी लावून दिला. गेल्या 9 महिन्यांपासून ही महिला आपल्या माहेरी राहत आहे. पीडित महिलेच्या मामाने ती माहेरी राहत असताना सतत तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
सध्या पीडित महिला 8 महिन्यांची गरोदर आहे. महिला गरोदर राहील्यानंतर तिच्या पतीने तिला स्विकारण्यास नकार दिला. पतीचीही साथ न मिळाल्याने पीडितेनं पोलीस स्टेशनचे दरवाजे ठोठावले आहेत.
फिर्यादीनुसार पोलिसांनी याप्रकरणी मामासमवेत कुटुंबातील आणखी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी पोलीस मामाच्या घरी गेले तेव्हा मामा सापडला नाही. पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अंकिता आणि रियानंतर सुशांतच्या तिसऱ्या एक्स गर्लफ्रेंडविषयी धक्कादायक खुलासा
पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं
कोण आहे राधिका मेहता?; सुशांत मृत्युप्रकरणी ईडीचा धक्कादायक खुलासा!