अजब चोरीची गजब गोष्ट! …म्हणून हा तरूण फक्त रिक्षावाल्यांचे मोबाईल चोरायचा; कारण वाचूल व्हाल हैराण 

पुणे | सध्या  या कलियुगात कोण कसा विचार करेल आणि केव्हा कुठे कोणासोबत काही घडेल याचा काही आता नेम नाही. प्रेमाच्या किस्से अनेकवेळा आपण ऐकले असतील त्यातील काही एकतर्फी  प्रेमाचे असतीव तर काही सक्सेस स्टोरी असतील. मात्र काहींना प्रेमात मिळालेला धोका पचवणं कठीण जातंय यामध्ये काहीजण आपला जीवन संवपतात तर काहीजण जिद्दीने आपल्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होऊन दाखवतात.

पुण्यातील एक युवक या सर्व गोष्टींना अपवाद ठरला आहे. त्याला प्रेमात नाही तर लग्न झाल्यावर धोका मिळाला यानंतर त्याने सूड घेतला पण ना आपल्या प्रेमिकेचा ना तिच्या प्रियकराचा त्याने सूड घेतला तो पुण्यातील रिक्षावाल्यांचा. गोंधळू नका, वाचा पुढे काय आहे ते प्रकरण.

मूळचा अहमदाबादचा असलेला आसिफ उर्फ भूराभाई अरिफ शेखने आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र घरच्यांचा लग्नाला विरोध होता. यासाठी गड्याने आपलं अहमदाबादमधील रेस्टारंट विकण्याचा निर्णय घेतला. त्याने असं ठरवलं होतं की रेस्टारंट विकून पुण्यात जावून काहीतरी नवीन व्यवसाय करत जीवनाला सुरूवात करायची. मात्र असीफच्या प्रेयसीने त्याला दगा दिला.

दोन दिवसांमध्येच तिने असीफजवळील पैसे आणि वस्तू घेऊन ती फरार झाली. जिच्यासठी त्यानेआ आपलं घरदार विकलं आणि पुण्याला आला तीच त्याला धोका दिल्याने तो तिच्या शोधात गुजरातला गेला तिथं गेल्यावर कळलं की तिने एका रिक्षावाल्यासोबत लग्न केलं. आसिफला मोठा धक्का बसला.  त्यानंतर नाराज झालेला आसिफ पुन्हा पुण्यात आपल्या लांबच्या नातेवाईकाजवळ राहून काम करू लागला.

आसिफच्या मनात मात्र रिक्षावाल्यांविषयी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात सूड घेण्याची भावना निर्माण झाली. त्यानंतर तो पुण्यातील रिक्षवाल्यांचे मोबाईल चोरू लागला. चोरी करण्याची त्याची एक विशष्ट पद्धत होती.

तो कात्रज, कोंढवा, कॅम्प या भागातील रिक्षात बसायचा आणि गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर रिक्षावाल्याला आपला फो बिघडला असल्याचं सांगून त्यांचा फोन घ्यायचा आणि बोलण्याच्या निमित्ताने रिक्षातून बाहेर पडत धूम ठोकायचा.

दरम्यान, आसिफला  पुण्याच्या कॅम्प परिसरातून पोलिसांनी सोमवारी एका मोबाईल चोराला अटक केली. पोलिसांनी आरिफ शेखला दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता कोर्टाने 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे. त्याच्याकडून 12 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतचा मित्र संदीप सिंह विषयी धक्कादायक माहिती समोर!

‘कॉंग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील होऊ शकतो’; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

…तर मग आरोग्यमंत्री राजेश टोपेंवरही गुन्हा दाखल करा- सुजय विखे पाटी

…तर सीबीआयला रिया चक्रवर्तीला अटक करावीच लागेल- सुब्रमण्यम स्वामी

पंतप्रधान नरेंद्र मोदी या पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली नेते आहेत- कंगणा राणावत