बंगळुरू | कर्नाटकातील केरागोडू पोलीस स्टेशन हद्दीतील कोडीहल्ली या गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गावातीलच भैरप्पा नावाच्या 30 वर्षीय नराधमानं सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पॉर्न दाखवत तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी नराधमाला बेदम मारहाण केली यातच नराधमाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भैरप्पा पीडित मुलीला अज्ञात स्थळी घेऊन गेला. त्यानंतर आरोपीनं पीडितेला पॉर्न दाखवत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर मुलगी जेव्हा घरी परतली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला.
घडलेला प्रकार ऐकून कुटुंबीय प्रचंड तापले व त्यांनी भैरप्पाला शोधत बेदम मारहाण केली. या मारहाणीत भैरप्पा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला काही गावकऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारदरम्यान आरोपी भैरप्पाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी भैरप्पाच्या मृत्यू प्रकरणी तीन जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! प्रेमाचं नाटक करत विधवा महिलेवर ‘या’ नेत्याने केला बलात्कार
धक्कादायक! पुण्यात पोलिसांनीच घडवून आणला शेतकऱ्यावर खुनी हल्ला अन् मग…
अयोध्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात; संभाजी भिडेंची मागण