स्वातंत्र्यदिनाला लागलं गालबोट! पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ, साताऱ्यातील खळबळजनक घटना

सातारा | आज देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिन असून सगळीकडे मोठ्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. ध्वजारोहन ठिकठिकाणी झालं. मात्र आजच्या स्वातंत्र्यदिनाला गालबोट लागलं आहे. महाराष्ट्रातील साताऱ्यमध्ये एत खळबळजनक घटना घडली आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका दाम्पत्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांनी हा मोठा अपघात टळला आहे. खाजगी बँकेकडून फसवणूक झाल्याने या दाम्पत्याने अगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

सातारा जिल्ह्यातील दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांनी नलावडे कुटुंबीयांची तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक केलीआहे. त्यामुळे या दाम्पत्याने या प्रकरणाची तक्रार वेळोवेळी पोलीस स्टेशनला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. इतकी मोठू फसवणूक झाल्याने त्यांनी आत्मदहनासारखा मोठा निर्णय घेतला.

दरम्यान, दोघांनी शेवटी स्वातंत्र्यदिनादिवशी आत्महदनाचा निर्णय घेतला आणि सकाळी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर पेट्रोल ओतलं मात्र तेथील पोलिसांनी वेळेत त्यांच्या हातातील रॉकेलचं कँड घेत हा पवित्र दिनादिवशीचा अनर्थ टाळला,.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! रक्षाबंधननंतर काही दिवसातच भावाने ज्याप्रकारे बहिणीचा खून केला ते ऐकून तुम्हीही व्हालं थक्क

“जे दिसतात ते सोबत नसतात, जे असतात दे दिसत नाहीत”

मेड इन इंडिया’ कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत कधी पोहोचणार?; नरेंद्र मोदी म्हणाले…

पुण्यातील पवार-फडणवीसांचा ‘हा’ योगायोग महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा तर नाही ना?

‘आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे, जगाला भारताकडून अपेक्षा आहेत’; लाल किल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकावला