आश्चर्यकारक! लग्न न करताच ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला होता बाबा

मुंबई | प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या जोडीला कुटुंबात आता आणखी एक नविन मेंबर आला आहे. नताशाने एका मुलाला जन्म दिला आहे. पांड्याने आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा जानेवारी मध्ये साखरपुडा झाल्याची माहिती मिळली होती. त्या दोघांनी लग्न केले की नाही याबाबत कोणालाही स्पष्ट कल्पना नाही. मात्र, पांड्या हा एकमेव क्रिकेटर नाही ज्याने लग्नाविषयी काही माहिती न देता बाबा होण्याची माहिती दिली. भारतीय क्रिकेट टीममध्ये असणारे प्रसिद्ध क्रिकेटर विनोद कांबळी यांनीही लग्नाअगोदर बाबा झाल्याची गुड न्यूज दिली होती.

विनोद कांबळी हे सचिन तेंडुलकर यांचे जवळचे मित्र होते. दोघांनी आपल्या करिअरला एकसाथ सुरुवात केली होती. विनोद कांबळी यांचा पहिला विवाह नोएला लाविस सोबत झाला. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी त्या दोघांच्यात घटस्फोट झाला होता.

पुढे विनोद कांबळी फॅशन मॉडेल एंड्रिया हेवीटसोबत रिलेशनशिपमध्ये होते. ते दोघे रेलशनशिपमध्ये असतानाच एंड्रियाने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्या दोघांनी लवकरच लग्न केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानानंच महिलेबरोबर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली- उपमुख्यमंत्री

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर दु: खाचा डोंगर; राजेश टोपेंच्या मातोश्रींचं निधन

“आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे”

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता