“दाभोलकरांना मारण्यात आलं तेव्हा गृहखात राष्ट्रवादीकडेच होतं, तुमच्याच सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला”

मुंबई | काल सुशांतच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना टोला लगावत भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजपकडून पवारांना सणसणीत प्रत्युत्तर आलं आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत 2014 मध्ये सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप सीबीआय त्यात कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत येऊ शकलेली नाही. त्यामुळं या चौकशी प्रक्रियेप्रमाणे सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासकार्याची परिणती होऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्यावेळी दाभोळकरांना मारलं तेव्हा राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार होतं आणि गृहमंत्रीही तुमच्याच पक्षाचा होता. तुमच्या सरकारने तब्बल 14 महिने या प्रकरणाशी निगडीत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला, हे विसरू नका, असं म्हणत भातखळकरांनी पवारांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी दिलेलल्या प्रत्युत्तरावर महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

ब्रँड इज ब्रँड! ‘क्रिकेट विश्वाच्या इतिहासात तुझं नाव…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहीला पाठवलं खास पत्र

मुंबई पोलिसांना न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर असताना रोखलं हे बरोबर नाही- संजय राऊत

काय सांगता…! कांदा एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा

रिया आणि सुशांतच्या नात्याची सुरुवात कशी झाली?; रियाने सांगितली ‘लव्ह स्टोरी’

भाजपचा कॉंग्रेसला मोठा झटका! कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी हाती घेतला भाजपचा झेंडा