मनोरंजन

‘वडील रुग्णालयात भर्ती, आता कोणच्या जीवावर खाणार’; अभिषेक बच्चनने हेटर्सना दिलं हे सणसणीत उत्तर!

मुंबई| कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात सध्या उपचार चालू आहेत. एका बाजूला त्यांचे चाहते ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला हेटर्स त्यांना ट्रोल करत आहेत. अभिषेकची खिल्ली उडवणाऱ्या एका ट्विटला त्यानं चांगलंच उत्तर दिलं आहे.

‘बाप अस्पताल में भर्ती है, अब किसके भरोसे बैठकर खाओगे ?’, अशा शब्दात एका युजरने अभिषेक बच्चनला डिवचलं. मात्र, अभिषेकने त्याच्या या प्रश्नाला खूप मिश्कीलपणे उत्तर दिलं. अभिषेक म्हणाला, ‘फिलहाल तो लेटकर खा रहे है दोनो एक साथ अस्पताल में’.

अभिषेकचे हे उत्तर ऐकूनही त्या युजरचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा अभिषेकला ‘गेट वेल सून सर. हर किसीके किस्मत मे लेटकर खाना कहा…’ असं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अभिषेकने युजरच्या या ट्विटलाही अतिशय नम्रपणे उत्तर दिले. तो म्हणाला, ‘मी प्रार्थना करतो की तुझ्यावर आमच्यासारखी स्थिती ओढवू नये. सुरक्षित आणि स्वस्थ रहा. शुभेच्छांसाठी आभार’.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारचं स्टिअरिंग नेमकं कोणाच्या हातात?; उद्धव ठाकरे म्हणाले…

स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार- रावसाहेब दानवेंचा टोला

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवतीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आज सेवानिवृत्त; मला सुद्धा अनेक आजार आहेत पण मी…

घरात सोनं ठेवताय? आता सरकारला द्यावी लागू शकते घरातील सोन्याची माहिती