भारतीय कर्णधार किंग कोहलीने दिली गोड बातमी, विराटच्या घरी पहिल्यांदाच हलणार पाळणा!

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने गोड बातमी दिली आहे. क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजांवर वर्चस्व करत त्यांचा बाप ठरणारा कोहली आता आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात बापमाणूस होणार आहे. विराट कोहलीने स्वत: ट्विट करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

आता आम्ही तिघे होणार, जानेवारी 2021, असं विराटने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अनुष्कानेसुद्धा अशीच पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे.

विराट एक दिग्गज खेळाडू आणि अनुष्का एक बॉलिवूड कलाकार दोघांची पहिली भेट ही एका जाहिरातीच्या शूट दरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांनी दोघांना जवळजवळ 4 वर्ष डेट केलं होतं. मात्र त्यांनी आधी जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीमध्ये गुपचूपपणे पण मोठ्या धामधुमीत आपला विवाहसोहळा उरकून घेतला. दोघांनीही आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते. त्यावेळी दोघांसाठी वेडे असलेल्या अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता.

कोहलीने सोमवारी इटलीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत 21 डिसेंबर 2017 ला सात फेरे घेतले. या विवाह सोहळ्याला काही जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आलं होतं.तर क्रिकेटर्स आणि सिनेकलाकारांसाठी 26 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.

लग्नामध्ये अनुष्कानं घातलेला लेहंगा 67 कारागिरांनी 32 दिवस मेहनत करून बनवला होता. अनुष्का-विराटच्या लग्नासाठी फुलांची थिम बनवण्यात आली होती. त्यामुळे कपडे डिझाईन करतानाही या थीमचा विचार करण्यात आला होता. म्हणून अनुष्काच्या लेहंग्याचा रंग पर्ल पिंक होता. अनुष्काच्या लेंग्यावर चिमण्या आणि फुलपाखरांचं नाजूक काम करण्यात आलं होतं.

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या ट्विटर आणि इंन्स्टाग्रामवरून गोड बातमी दिली. चाहत्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात  विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर विराटने केलेल्या ट्विटवर एका तासात जवळजवळ 1 लाखाच्या पुढे चाहत्यांनी लाईक्स दिले आहेत. तशी कोहली आणि  अनुष्काची जोडी ही भारतातच नाही तर संपुर्ण जगभर प्रसिद्ध आहे.

 

https://www.instagram.com/p/CEYZINOpd53/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या-

खरतनाक! खोट्या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर मी…; प्रवीण तरडे संतापले

निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते- संजय राऊत

‘काँग्रेस पक्षांतर्गत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मला खडानखडा माहिती द्या’; पवारांनी काँग्रेसच्या ‘या; नेत्यावर सोपवली जबाबदारी

रिया स्वतः ड्रग्ज घेऊन सुशांतलाही ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त करत होती?; अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल

“कॉंग्रेस नेत्यांनी पत्राचा विषय संपवून पक्षासाठी संघटन स्तरावर जोमाने काम करावं”