‘…त्यावेळी महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले’; तुकाराम मुंढेंनी केला खळबळजनक खुलासा

मुंबई | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची दोन-तीन दिवसांमागे बदली करण्यात आली. समाजात कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख आहे. मात्र ते सेवेवर रुजू झाल्यापासून त्यांच्या खूपवेळा बदल्या झाल्या. तुकाराम मुंढेंबाबत असं का?, नक्की राजकारण्यांना त्यांचं काय वावडं आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’ दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

नागपूरमध्ये असताना दररोज माझ्याविरोधात अनेक गंभीर आरोप केले जात होते. त्यावेळी मला पुर्णपणे टारगेट केलं जात होतं. माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात होता. हे सर्व कोण करणार?, भाजपची लोक होती?, असा सवालही यावेळी मुंढे यांनी उपस्थित केला आहे.

मी नक्की काय गुन्हा केला होता की नागपूरमधून माझी बदली करण्यात आली?, असा सवालही मुंढे यांनी लोकमतशी बोलताना केला. सर्वात धक्कादायक म्हणजे माझ्या विरोधात ज्यावेळी काहीच पुरावे नाही सापडले तर त्यांनी चारित्र्यहिनाचा प्रकार घडवण्यात आला. त्यावेळी महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले असल्याचा धक्कादायक खुलासा मुंढे यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मी आता माझा आक्रमकपणा कमी केला आहे. माझ्या स्वभावाला मुरड घातली पण आता यापुढे माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आता माझ्या तत्वांशी तडजोड करणार नसल्याचं मुंढेंनी सांगितलं आहे.

मी जर माझ्या तत्वांना तिलांजली दिली तर मीच माझ्या पाठीत खंजीर मारल्यासारखं होईल, असं मत तुकाराम मुंढेंनी व्यक्त केलं. मुंढें राजकारण्यांच्या डोळ्यात सलत असले तरी जनतेमध्ये त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात आदर आहे.

नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये असताना मुंढे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधिंनींनी टीका केली होती. मात्र मुंढेंनी केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! “सुशांतचा पाय मोडलेल्या अवस्थेत होता आणि त्याच्या गळ्यासह ‘या’ भागावर सुयांनी टोचलेलं होतं”

‘सत्तेचं दार बंद झाल्यानं भाजपचा घंटानाद…’; रुपाली चाकणकरांचा भाजपला टोला

‘ड्रग्ज विषयीचे ते व्हाट्सअ‌ॅप चॅट्स…’; सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा!

कॉंग्रेसचा लखलखता तारा निखळला; कॉंग्रेसच्या ‘या’ बड्या खासदाराचं कोरोनानं निधन!

“गांजा घेणाऱ्या सुशांतच्या मृत्यूची चर्चा पण रेवणनाथच्या मरणाची नाही”