Top news

ठाकरे सरकारचं स्टिअरिंग नेमकं कोणाच्या हातात?; उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत विरोधी पक्षातून असं बोललं जात होत की, उद्धव ठाकरे हे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहेत. सर्व निर्णय अजित पवार घेतात. त्यावरून मोठा राजकीय वादंग झाला होता. मात्र ठाकरे सरकारचं स्टिअरिंग नेमकं कोणाच्या हातात यावर खुद्द उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कार आणि सरकार दोन्ही चांगल्याप्रकारे सुरू आहे आणि सगळेजण एकमेकांना सहकार्य करत व्यवस्थित चालत आहे. आम्ही कारही चालवत आहोत आणि सरकारही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देताना एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये एका गाडीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार बसलेले असतात आणि त्या गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात असतं. तेव्हापासून ठाकरे सरकारचं स्टिअरिंग नक्की कोणाच्या हातात आहे, याबद्दल अनेक चर्चांणा उधाण आलं होतं.

दरम्यान ठाकरे सरकारचा स्टिअरिंग कोणाच्या हातात आहे?, असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले होते की, सध्या हा एक संशोधनाचा विषय आहे. मात्र उद्धव ठाकरे सावरून सावरून पावलं टाकत आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय लवकर होत नाही. सध्याच्या काळात आपली निर्णयक्षमता दाखवावी लागते.

महत्वाच्या बातम्या-

स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार- रावसाहेब दानवेंचा टोला

गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवतीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आज सेवानिवृत्त; मला सुद्धा अनेक आजार आहेत पण मी…

घरात सोनं ठेवताय? आता सरकारला द्यावी लागू शकते घरातील सोन्याची माहिती

कोरोना पॉझिटिव्ह आईने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म; बाळांचे रिपोर्ट आले…

IMPIMP