‘चंद्रकांत पाटील म्हणजे विरोधकांना जीवनातून उठवणारे’; राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचं पाटलांवर टीकास्त्र

कोल्हापूर | मागील काही दिवस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत. अशातच  चंद्राकांत पाटलांचा दुसरा चेहरा म्हणजे जीवनातून उठवून टाकणारा आहे, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी पाटलांवर केली आहे.

आत्ता मला सोशल माध्यमातून चंद्रकांत दादांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली आणि कोणतीही मदत केली नाही, असं लिहिलेलं पत्र मला मिळालं परंतू मी असं काही म्हणलोच नाही, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

उलट दादा गेल्या पंचवार्षितमध्ये मिळवलेली संपत्ती आणि पैसा याचा विचार केला तर तुम्ही दोन-तीन लाख नागरिकांना पाच वर्षे तुम्ही मदत कराल याची खात्री आहे. पण जर तीच मदत मी व माझ्या फौऊंडेशनने केली तर तुम्ही माझ्यावर  ईडी, इन्कम टॅक्स विभाग माझ्या मागे लावाल, म्हणून मी मदत जाहीर केली नसल्याचं म्हणत हसन मुश्रीफ यांनी पाटलांना टोला लगावला.

दरम्यान, मी अनेकवेळा तुमचे दोन चेहरे पाहिले आहेत. एक तुमचा स्वभाव दिसायला मृदू, लोकांना मदत करणारा, विचार न करता मुक्त वक्तव्य करणारा, दिसायलाही प्रांजळ. दुसरा स्वभाव म्हणजे मिळालेल्या सत्ता व संपत्तीचा आपला कोणीही विरोधक मग साधा टीका करणारा असो. त्याचा काटा काढायचा त त्याला जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न करणारा असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते, त्रास होत असेल तर पाकिस्तानात जावं”

…म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री थेट सोनिया गांधींना भेटणार

चीनसोबत सामना तर लांबच पण चीनचं नाव काढायची हिम्मतही मोदींमध्ये नाही- राहुल गांधी

आरोग्यमंत्र्यांना सलाम! मातृशोकानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी टोपे पुन्हा कर्तव्यावर हजर

फडणवीसांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आमलात आणलेली ‘ती’ योजना ठाकरे सरकारकडून रद्द