राष्ट्रवादीवर पसरली शोककळा! ‘या’ दोन बड्या नेत्यांच एकाच दिवशी निधन

अहमदनगर | गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. देशावरील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. अनेक दिग्गज कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशातच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. काल राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचं निधन झालं आहे.

अहमदनगरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तसेच जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत आणि अहमदनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांच एकाच दिवशी निधन झालं आहे. नगरमधील दोन बड्या नेत्यांच एकाच दिवशी निधन झाल्यानं राष्ट्रवादीवर शोककळा पसरली आहे.

बाबासाहेब गाडळकर यांचा काही दिवसांपुर्वी कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानं त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमनाथ धूत यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दोन्ही धुरंदर नेत्यांना एकाच दिवशी गमावल्याने अहमदनगर शहरासह  राष्ट्रवादीवर शोककळा पसरली आहे. सोमनाथ धूत हे  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू मानले जात होते.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून पुणे न्यायालयाने चंद्रकांत पाटलांविरूद्ध दिले चौकशीचे आदेश

रिया आणि महेश भट्ट यांच व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानं सुशांत प्रकरणाला नवं वळण

बॉलीवुडमधील ही प्रसिध्द अभिनेत्री होती सुशांतची तिसरी गर्लफ्रेंड; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा!

“गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांनो फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षावर कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली”

…हा तर उद्धव ठाकरे सरकारला जबरदस्त झटका- बबिता फोगट