अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांंना कोरोनाची लागण

अमरावती | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल आहे. मागील चार ते पाच दिवसांपुर्वी त्यांच्या घरातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते.  मात्र त्यांना आज काहीसं अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. तेव्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यासंदर्भात त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.

नवनीत राणा यांनी फेसबूकवर पोस्ट करत माहिती दिली की, माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते. मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा, शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे, असंही राणा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी नवनवीत राणा यांनी आपल्या मुलाची स्वॅब टेस्ट घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वाब घेताना ज्या पद्धतीने तो रडायला लागला हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या, असं त्यानी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘सुशांतसिंह राजपूतचा गळा दाबून खून?’; सुशांतचे चाहते संतापले

‘या’ भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या; गेल्या 48 तासांत दुसरा हल्ला!

आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या; आत्महत्येच कारण अस्पष्ट !

हजारोंचं जीवन उद्धवस्त करणाऱ्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे सावट

धक्कादायक! जन्मदात्यानेच पोटच्या मुलीवर लैगिक अत्याचार करत कुटुंबियांसोबत केलं ‘हे’ कृत्य