राऊतांनीच सुशांतची केस सीबीआयकडे जाण्यासाठीचं काम सोप्प केलं आता तेच तोंडावर पडलेत- नारायण राणे

मुंबई | सुशांतच्या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे जाण्यासाठीचं काम शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोप्प केलं. कारण संजय राऊत सारखं सारखं यावर का बोलत होते?, असं म्हणत भाजप खासदार राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

मी सुशांतच्या प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव कधीही घेतलं नव्हतं. मात्र संजय राऊत नेहमी आदित्य ठाकरेंचा या सुशांतच्या प्रकरणाशी काहीही संंबंध नसल्याचं बोलत होते. परंतू जर काहीच संबंध नव्हता तर मग राऊत का बोलत होते, असं म्हणत सामनाचे संपादक राऊत तोंडावर पडले असल्याचं राणेंनी म्हटलं आहे.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास हा चुकीच्या पद्धतीने चालू होता. त्यामुळे राज्य सरकार उघडं पडलं आहे. मुंबई पोलीसांवर मला विश्वास आहे मात्र इतके दिवस ते कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना आदेश दिला आहे की, सुशांतच्या चौकशी करताना मिळालेले सर्व पुरावे सीबीआयला देण्यात यावेत. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र- संजय राऊत

सुशांत प्रकरण सीबीआयकडे जाताच बॉलीवूड क्वीन कंगना रनौत म्हणतेय…

सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; भाजप नेत्या आणि शरद पवारांच्या नातवाची एकच प्रतिक्रिया!

महाराष्ट्र सरकारने सुशांतच्या प्रकरणावर आत्मचिंतन करण्याची गरज; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!