रामाचा वनवास अखेर संपला; ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न

अयोध्या | गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या गोष्टीची रामभक्त आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर पार पडला आहे. अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे. भूमिपूजन करण्या अगोदर मोदींच्या हस्ते मुख्य पूजा पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आंनदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे यावेळी उपस्थित होते.

भूमीपूजनासाठी मोदींनी चांदीचं फावडं वापरलं. त्याबरोबरच चांदीची विट पायभरणीच्या ठिकाणी ठेवण्यात आली. याअगोदर नरेंद्र मोदींनी पारिजातकाचं वृक्षारोपण केलं. सोशल डिस्टन्सिंगच पालन करत हा सोहळा पार पडला आहे.

या सोहळ्या अगोदर पंतप्रधानांनी हनुमानगढीत पूजा केली. तिथेच त्यांनी चांदीचा मुकुट अर्पण केला. अत्यंत भक्तिमय वातावरणात व जल्लोषात हा सोहळा पार पडला आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनाने सर्व संत, महंत व भक्तगण आनंद व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“राम मंदिराला न्याय मिळवून देणारे गोगाई अन् बाबरीची घुमटे पायापासून उध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”

पंतप्रधान मोदींचं प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत; भूमिपूजन स्थळी दाखल

राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

शिवसेनेचा लखलखता तारा निखळला; 25 वर्ष आमदारकी बजावणाऱ्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन

मुख्यमंत्रिपदावर असताना मुलीच्या मार्कांमध्ये निलंगेकरांनी बदल केला होता