…तर आधी केंद्रातलं सरकार पडणार; सुशांत सिंहच्या प्रकरणावर राऊत यांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्युप्रकरणी सध्या राजकीय पक्षांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहे. मात्र अशातच शिवसेना नेते संंजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

सुशांत सिंह प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होऊ लागली तर आधी केंद्रातील सरकार पडेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह प्रकरणावरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांत सिंहला न्याय मिळो अशी माझी प्रार्थना. सुशांतच्या प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी सुशांतच्या प्रकरणात थेट केंद्राला ओढलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपकडून राऊतांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील सख्ख्या मावशीने पुतणीला वेश्या व्यवसाय कर म्हणत तिच्यासोबत केलं ‘हे’ संतापजनक कृत्य

कोरोनाची लस बाजारात आणणारं रशिया ठरलं पहिलं राष्ट्र!

48 तासात संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा…; सुशांतच्या भावाची राऊतांना नोटीस

‘सुशांतला हॉटेलमध्ये दिसलं होतं भूत…’; रियाने पोलिसांना सांगितली ‘त्या’ दिवशीची हॉटेलमधील कहानी!

“…म्हणून उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल”