Uncategorized

… तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा इशारा

मुंबई | कोरोना व्हायरसमुळे जगातील 10 कोटी लोकांची कमाई बंद झाली आहे असून जवळजवळ 40 कोटी कुटूंब कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत. त्यामुळे जर लवकरात लवकर लोकांच्या नोकरी जाण्याच्या समस्येवर काही तोडगा नाही निघाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इस्त्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिक नेतन्याहू यांच्याविरोधात प्रदर्शने सुरु आहेत. कोरोना महामारी आणि जागतिक आर्थिक संकटाशी लढण्यास असमर्थ राहिल्याने लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ही प्रदर्शन भारतातही दिसू शकतात, असं म्हणत राऊतांनी मोदींना इशारा केला आहे.

मध्यमवर्गीय लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यापार, उद्योगधंदे बंद झाल्याने तब्बल 4 लाख कोटींचे नुकसान झालं आहे. लोकांची सहन करण्याची एक क्षमता असते आणि लोक हे आश्वासनांवर जिवंत नाही राहू शकत नाहीत. प्रभू श्रीराम यांचा वनवास संपला असला तरी सध्याचा काळ खूप कठीण असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणतात की महाराष्ट्रात स्वबलावर सरकार आणणार, मात्र ते कोरोनाचं संकट, बेरोजगारी यावर कोणीही बोलत नसल्याचं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

आश्चर्यकारक! लग्न न करताच ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला होता बाबा

दिलासादायक! अमिताभ बच्चन यांना आज मिळणार डिस्चार्ज

चार पाच लफडी ठेवणं हा तर शिवसेना आमदार, खासदारांचा धंदाच आहे- निलेश राणे

संतापजनक ! रात्रीचा डाव साधत 83 वर्षीय वृद्ध महिलेवर युवकांनी केला बलात्कार

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

IMPIMP