धोनीला कॅप्टन करताना मला खात्री होती की…; शरद पवारांनी केली खास फेसबूक पोस्ट!

मुंबई | भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने काल स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रात्री साडेसात वाजता क्रिकेटला अलविदा केलं आहे. धोनीने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहेत. अनेक दिग्गजांनी धोनीला दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धोनीसाछी एक खास फेसबूक पोस्ट केली आहे.

क्रिकेटचा आणि माझा फार काळ संबंध राहिलेला आहे. धोनीची कर्णधारपदी निवड करताना मला खात्री होती की भारताचा हा सर्वात यशस्वी कर्णधार होईल, असं शरद पवार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

धोनीचं क्रिकेटमधील योगदान हे अद्वितीय, प्रेरणादायी आणि त्याचे विक्रम हे अनुकरणीय असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2007 साली विषवचषकात झालेल्या पराभवामुळे द्रविडने कर्णधारपद सोडलं होतं. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार होते. तेव्हा पवारांनी धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

जलविष्काराची कमाल; तब्बल 100 हुन अधिक गावात पाणी साठवण

कंगना राजकारणात जाणार का?, ट्रोलर्सच्या या प्रश्नावर अखेर कंगनानं सोडलं मौन; म्हणाली…

आत्मनिर्भर भारताचं पहिले यश; भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी

ऐकावं ते नवलंच! चंद्रावर राहण्यासाठी वैज्ञानिकांनी बनवली मानवाच्या मूत्रापासून वीट; सविस्तर जाणून घ्या

झेंडा मागे मग सॅल्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री, समोर सीबीआय दिसली की काय?- निलेश राणे