“निषेध! कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी”

मुंबई | बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेतेही चांगलेच तापले आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारला एक मागणी केली आहे.

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये संपूर्ण देशाचे आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याचा निषेध नोंदवत महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करत पत्र लिहिलं आहे.

कर्नाटक सरकारने संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करुन आराध्यदैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी अशी मागणी राष्ट्रवादी नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही केली आहे.

दरम्यान, कर्नाटकच्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वावडं आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र या कृत्यामुळे शिवभक्त चांगलेच संतापले आहेत. उद्या म्हणजे 9 ऑगस्टला महाराष्ट्रातून शिवभक्त आंदोलन करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

आमदाराच सांगत आहे, ‘मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका मी तुमच्यासोबत आहे’

चांगली बातमी! एसटी कर्मचाऱ्यांनो आपली बँक खाती तपासून पहा, ‘या’ महिन्यापासूनचे पगार झालेत जमा!

इंदोरीकरांच्या पुत्रप्राप्तीच्या ‘त्या’ वक्तव्यावर न्यायालयानं बजावली महत्वाची भूमिका

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा रोतोरात हटवला; शिवभक्त संतापले

पैसा कमावणं हा शिवसेनेचा एकमेव धंदा; नारायण राणेंची गंभीर टीका