माणूस म्हणावं की हैवान?; नवजात बाळाला स्मशानभूमीत जिवंत पुरलं अन्…

रांची | झारखंड मधील लोहरदगा जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका स्मशानभूमीत नवजात बाळाला जिवंत पुरल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, स्मशानभूमिपासून जाणाऱ्या एका व्यक्तीने बाळाचा रडल्याचा आवाज ऐकल्याने बाळाचे प्राण वाचले आहेत.

चंदलासो धरणाजवळील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी एका जिवंत नवजात बाळाला पुरण्यात आलं होतं. स्मशानभूमी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यामुळे त्या व्यक्तीने स्मशानभूमीत धाव घेतली. स्मशानभूमीत गेल्यानंतर त्याला एक नवजात बाळ मातीत अर्धे पुरले असल्याचं दिसून आलं.

त्या व्यक्तीने बाळाला सुखरूप बाहेर काढलं आणि तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी बाळावर वेळेत उपचार केल्याने बाळाचे प्राण वाचले आहेत. सध्या हे नवजात बाळ सुरक्षित असून, लोहरदगा जिल्ह्यातील एका कुटुंबाच्या घरी आहे.

नवजात बाळाला स्मशानभूमीत दफन केल्याची माहिती मिळताच कुरु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. कुरु पोलीस सध्या नवजात बाळाचे पालक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नवजात बाळाबरोबर पालकांनी हे धक्कादायक कृत्य केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“जेव्हा जेव्हा देश भावुक झाला, तेव्हा तेव्हा महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्या”

मृत कोरोनाग्रस्ताला कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं; तृतीयपंथियांसह-नागरिकांनी घालून दिला आदर्श

दिशा सॅलियन आणि सुशांतचं नातं काय?; मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

तुझ्या शरीराचं ते अंग दाखव; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे झाली होती मागणी

पत्नीनं मारहाण केल्याचा आरोप; चक्क पोलिसानंच पोलीस ठाण्यात दिली तक्रार