….म्हणून आमिर खान ठेवणार मोबाईल फोन बंद, जाणून घ्या!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान नेहमीच काहीतरी वेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. आमिर खान लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आपला मोबाइल बंद ठेण्याचा मोठा निर्णय आमिरने घेतला आहे. आमिर खान आपल्या भूमिकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करताना पहायला मिळतो. अशातच चित्रीकरण करत असताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्याने मोबाइल बंद ठेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरबरोबरच अभिनेत्री करिना कपूर खानही झळकणार आहे. आमिर आणि करिना शेवटचे ‘3 इडियट्स’ चित्रपटात एकत्र दिसले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)

1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.

यापूर्वी आमिरचे ख्रिस्मसला प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले. त्यामुळे आता ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाकडे साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-