महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य राहिलेले सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन

पुणे | महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य राहिलेले माजी आमदार सुधाकरपंत परिचारक याचं कोरोनाच्या आजारामुळे दुख:द निधम झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी परिचारक यांची प्राणज्योत मावळली.

परिचार गेले दोन दिवस कृत्रिम श्वासोच्श्वासावर होते.  काल रात्री साडे अकराच्या सुमारास पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये त्याचं निधन झालं. सुधाकरपंत परिचारक यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुण्यात पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली आहे.

सुधाकरपंत परिचारक यांना 5 ऑगस्टला श्साव घ्यायला त्रास होत होता आणि कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रितीश परिचारक यांनी दोन दिवसांपुर्वी एक भावनिक पोस्ट करत जिल्हावासीयांना आवाहन केलं होतं, ‘गेली 50 वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे’ मात्र सर्वांच्या प्रार्थना कुठेतरी कमी पडल्या असाव्यात.

दरम्यान, सुधाकरपंत परिचारक यांनी दीर्घकाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिला होता. त्यासोबतच त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

“तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय”

“सुशांत कधीच आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करत नव्हता… सुशांतला त्याच्या स्टाफनेच मारलं”

राज ठाकरेंनी सुनील ईरावरांच्या कुटुंबियांसोबत फोनवरुन साधला संवाद, वाचा काय म्हणाले राज ठाकरे…

“संघर्षाची भीती मला कधी वाटली नाही… तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर त्याचा मला जास्त त्रास होईल

‘या’ बाबतीत महाराष्ट्र मागासलेला का दाखवता?; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल