सांगली | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या अनेक खुलासे होत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज लोकांवर सुशांतच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. मात्र आता शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात उडी घेतली आहे.
सुशांत सिंहबद्दल बोलून आपलं आयुष्य वाया घालवणं हे सुद्धा चूक आहे. सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेलं तर सुशांतचं काही लफडेबाज जिवन असेल. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल. सुशांतची लायकी तरी काय आहे, असा दावा भिडे गुरुजी यांनी सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणावर केला आहे.
देशाला आदर्श असावेत तर ते भगवान श्री कृष्ण, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज हे असावेत. सुशांत हा लायकीचा पण माणूस नाही. मात्र दुर्दैव असं की आपल्या समाजाने आदर्श मानले ते सिनेमातील नट आणि नट्या, असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर ते आज सांगलीत बोलत होते. यावेळी संभाजी भिडे यांनी राम मंदिराबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना सुशांत सिंग राजपूतवरही टीकास्त्र सोडले
महत्वाच्या बातम्या-
चीनकडून युद्धाचे संकेत; सीमेलगत अण्वस्त्रवाहू विमाने, फायटर विमाने तसेच हजारो सैन्य तैनात
आत्महत्येपूर्वी सुशांत सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी; मुंबई पोलिसांचा नवा खुलासा
खुशखबर! आता घरीच करू शकाल कोरोनाची चाचणी अखेर भारताने बनवलं स्वस्तातलं टेस्टिंग किट!
नव्वदीपार केलेल्या महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानी केली कोरोनावर मात
“सुशांत सिंहच्या खात्यातून गेल्या 90 दिवसात रियाने तब्बल इतके कोटी केले खर्च”