पुणे हादरलं! पुण्यातील कर्वेनगरमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या करत केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिलं ‘हे’ कारण

पुणे | पुण्यात एका वृद्ध नागरिकाने प्रथम पत्नीची हत्या करुन त्यानंतर स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील गंगा विष्णू संकुल, कर्वेनगर येथे घडली आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून वृद्ध नागरिकाने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे.

अविनाश हेमंत गोरे (वय 69) आणि वैशाली अविनाश गोरे (वय 66) हे दाम्पत्य पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहत होते. या दाम्पत्याला एक मुलगी असून ती विवाहित आहे. त्यामुळे कर्वेनगरमध्ये हे दोघेच एकत्र राहत होते. अविनाश गोरे हे एलआयसीमध्ये स्टेनो ग्राफर म्हणून काम पाहत होते.

अविनाश गोरे यांची पत्नी गेल्या काही दिवसांपासून शारीरिक व्याधींनी त्रस्त होती. पत्नीच्या शारीरिक त्रासामुळे अविनाश गोरेही कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीच्या आजारपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये तिची गळा दाबून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर स्वतःही ओढणीने गळफास घेत जिवन संपवलं.

दरम्यान, कर्वेनगर पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याबरोबरच पोलीस यासंबंधीत आणखी तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

महाकाय कोविड सेंटरसाठी लवासा ताब्यात घ्या- गिरीष बापट

कोरोनाग्रस्त मातेने आपल्या बाळाला जन्म दिल्यावर घेतला अखेरचा श्वास; बाळाचा अहवाल आला…

ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून पुण्याकडे रवाना!

संतापजनक! कोरोना चाचणीच्या नावे तरुणीच्या गुप्तांगातून घेतले स्वॅब!

धक्कादायक! कोरोनामुळे मृत्यु झाल्याने थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच केले सपासप वार