“अमित भाई, लवकरात लवकर बरे होऊन कोरोनाच्या या काळात आम्हाला मार्गदर्शन करावं”

मुंबई | देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहिती स्वत: आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना दिली. ही माहिती समजताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत अमित शहांना लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

अमित भाई, आपण लवकरात लवकर बरे होऊन नेहमीसारखं पूर्ण उर्जेने काम करावं आणि कोरोनाच्या या भीषण संकटात आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, असं ट्विट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शहांना लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

अमितजींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशा सदिच्छा राहुल गांधी यांनी दिल्या आहेत. राहुल गांधींनी एका ओळीचं ट्विट करत अमित शहा यांना बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली आणि त्या चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण एम्स रुग्णालयात दाखल झालो असल्याचं अमित शहा यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामायणातील मंथरेसारखे; हनुमान गढी महंतांची टीका

गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; राहुल गांधी म्हणाले…

कौतूकास्पद! सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी गौतम गंभीरने उचललं मोठं पाऊल!

बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच राजकीय षडयंत्र- जितेंद्र आव्हाड

‘तो क्षण जेव्हा मी त्याला हो म्हणाले..’; सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केली गोड आठवण