चंपा, टरबुज्या म्हटलं तर…; भाजप नेत्यांना ठेवण्यात आलेल्या टोपण नावाने चंद्रकांत पाटील भडकले!

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्याला  आत्तापर्यंत क्वचितच चिडलेले दिसले असतील. टीका करतानासुद्धा बेधडकपणे ते टीका करतात, संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं. मात्र चंद्रकांत पाटील एका कारणामुळे विरोधकांवर चांगलेच भडकले आहेत.

सत्ताधारी पक्षातील आणि इतर पक्षाचे नेते भाजप नेत्यांना त्यांच्या नावावरून किंवा इतर कोणत्या गोष्टीवरून त्यांच्यावर शेरेबाजी केली जाते. मात्र पाटलांनी अशी शेरेबाजी करणाऱ्यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्र भाजपच्या पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.

नावावरून शेरेबाजी केलेली आता खपवून घेतली जाणार नाही. यापुढे कोणी हिणवलं तर खपवून घ्यायचं नाही, असं पाटलांनी सांगितलं आहे. त्यासोबतच पाटलांनी कार्यकर्त्यांना आक्रमण व्हा, असं सांगितलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांवर राष्ट्रवादी, मनसे आणि सोशल मीडियावरुन सुरु झालेली शेरेबाजी अजूनही सुरुच आहे. यामुळेच आता चंद्रकांतदादा चांगलेच संतापले आहेत.  विधानसभा निवडणुकीत नावाचा शॉर्टफॉर्म शोधून अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हटलं होतं. तर अजित पवारांनी चंपा म्हटल्यानंतर राज ठाकरेंनीही पुण्यात चंपा नावाचं चंपी केलं.

महत्वाच्या बातम्या-

भाजपचा पडद्याआड महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न सुरू आहे- शरद पवार

जसं शरद पवारांचं वय वाढतंय तसा त्यांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढताना दिसतोय- निलेश राणे

…म्हणून सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात केला गुन्हा दाखल; तक्रारीमध्ये केले ‘हे’ धक्कादायक आरोप!

राम मंदिराच्या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तर जाणार का?; शरद पवार म्हणाले…

भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार?, फडणवीसांनी जरा स्पष्टच सांगितलं; म्हणाले…