Top news देश

केंद्र सरकारचा पब जी गेमला ‘पट से हेडशॉट’; पब जी गेमसह 118 अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय

नवी दिल्ली | भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात लोकप्रिय असलेली प्रसिद्ध पब जी गेमसह 118 अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या भारताच्या सीमेवर चीन- भारतामध्ये वाद चालू आहेत याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

केंद्र सरकारने 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली असल्याचा निर्णयाबद्दल माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.  भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे. याबाबत पीटीआयने वृत्त दिलं आहे.

भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. मंत्रालयाने आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचंही सांगितलं आहे.

या तक्रारींमध्ये असं म्हटलं जातं होतं की अँडॉइड आणि त्यासोबत आयआएसओवर उपलब्ध असणारे फोन अॅपचा बेकयादेशीरपणे युजर्सचा डाटा चोरत असून हा डेटा बाहेरील सर्व्हरवरला पाठवला जात आहे. त्याच्यामुळे हा देशाच्या सुरक्षेतचा प्रश्न असल्याने यावर ताताडीने उपाय करण्याची गरज होती, असं मंत्रालयाने सांगितलं आहे.

भारत सरकारने याआधीही चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळा चीनी सैन्याने गलवाण खोऱ्यात भारतीय सैन्यावर आक्रमण केलं होतं. त्यावेळी भारताचे 20च्या आसपास जवान शहीद झाले होते. मात्र याचा बदला भारतीय सैन्याने चीन्यांच्या डबल सैन्याचा फडशा पाडला होता.

भारतातही मुलांच्या पालकांनी पब जी गेम बंद करण्याची मागणी केली होती. कारण मुलं पुर्णपणे गेमच्या आहारी गेली असून काही मुलांच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणजे त्यांचा मेंदूवरील ताबा सुटला.

काही मुलं रात्रीत झोपेत असताना दचकणं, झोपत चावळणं अशा प्रकारांमुळे पालकांनी ही गेम बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“10- 12 वर्षांपु्वी जन्माला आलेले आता राजकारणात चमकायला लागले असून ते आम्हाला अक्कल शिकवत आहेत”

‘तुम्ही तुमच्या रक्ताचे नमुने ड्रग टेस्टसाठी द्या’; बॉलिवूडच्या या बड्या कलाकारांना कंगणाने केलं आवाहन

आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील टीव्ही9 चे पत्रकार पांडुरंग रायकर याचं निधन

येणारे 3 महिने धोक्याचे, राज्य सरकारने खबरदारी म्हणून घेतला मोठा निर्णय