शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल उपमुख्यमंंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जाहीररित्या फटकारल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावं?, हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवाने ठरवायचं आहे. यावर मी काय बोलणार, असं देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करायला माझी कीहीही हरकत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पार्थ यांना चांगलंच फटाकारलं.

दरम्यान, माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशी करायची असेल तर मी विरोध करणार नाही. मात्र माझा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीरपणे काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं- निलेश राणे

धक्कादायक! मतिमंद मुलीवर बलात्कार; सहा महिन्यानंतर ‘अशा’ प्रकारे सत्य आलं समोर

मी एक संवेदनशील व्यक्ती आहे, काही चूक झाली, तर मी माफी मागायला तयार- संजय राऊत

धक्कादायक! आईचं वात्सल्य हरवलं; शुल्लक रकमेसाठी आपल्या पोटचा गोळा विकला

“मोदी है तो मुमकीन है”; राहुल गांधी पुन्हा कडाडले