‘काँग्रेस पक्षांतर्गत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मला खडानखडा माहिती द्या’; पवारांनी काँग्रेसच्या ‘या; नेत्यावर सोपवली जबाबदारी

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. काँग्रेस पक्षांतर्गत सुद्धा बऱ्याच घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षातील बरेच नेते एकमेकांवर नाराज असल्याच्या चर्चा चालू आहेत. काँग्रेस पक्षामध्ये चालू असणाऱ्या अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादी नेते शरद पवार चिंताग्रस्त झाले आहेत.

केंद्र पातळीवर काँग्रेस हा विरोधी पक्षातील महत्वाचा दुवा आहे. विरोधी पक्षांतील हा महत्वाचा दुवा दुर्बळ होऊ नये म्हणून पक्षांतर्गत स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेस पक्षांतर्गत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मला खडा न खडा माहिती लगेचच द्यावी, असंही पवार यांनी पटेल यांना सांगितलं आहे.

गेल्या दोन लोकसभा निवणुकीमध्ये कोंग्रेसची कामगिरी अतिशय वाईट ठरली आहे. देशातील मोजक्याच राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. अशात जर कोंग्रेस पक्ष आणखी खचत गेला तर त्याचा परिणाम ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे.

ही शक्यता ओळखून शरद पवार वेळीच सावध झाले आहेत. विरोधी पक्षातील हा महत्वाचा दुवा प्रबळ रहावा म्हणून त्यांनी पक्षाला जोडून ठेवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. पवार यांनी सोपवलेली जबाबदारी पार पडण्यासाठी पटेल मंगळवारी तातडीनं दिल्लीत पोहचले आहेत. सध्या प्रफुल्ल पेटेल दिल्लीतच आपला तळ ठोकून बसले आहेत.

कॉंग्रेस पक्ष आणखी सबळ व्हावा अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे या नाजूक परस्थितीत सतर्क राहणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग राष्ट्रीय स्तरावर करणेही शक्य आहे, असं पटेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मागच्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी अतिशय वाईट आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षातील 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होत. पक्षाला मोठ्या बदलाची गरज असल्याचं त्यांनी या पत्रातून म्हटलं होतं. तसेच पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्षाची सध्या गरज आहे, असंही या 23 नेत्यांनी पत्राद्वारे म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

रिया स्वतः ड्रग्ज घेऊन सुशांतलाही ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त करत होती?; अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल

“कॉंग्रेस नेत्यांनी पत्राचा विषय संपवून पक्षासाठी संघटन स्तरावर जोमाने काम करावं”

धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

अजब चोरीची गजब गोष्ट! …म्हणून हा तरूण फक्त रिक्षावाल्यांचे मोबाईल चोरायचा; कारण वाचूल व्हाल हैराण

सुशांतचा मित्र संदीप सिंह विषयी धक्कादायक माहिती समोर!