खुशखबर! आता घरीच करू शकाल कोरोनाची चाचणी अखेर भारताने बनवलं स्वस्तातलं टेस्टिंग किट!

नवी दिल्ली | सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक लोक लक्षण दिसत असतानाही कोरोना चाचणी करण्यासाठी घाबरत आहेत. मात्र आता चिंता नसावी. भारतातीलच काही डॉक्टरांनी मिळून घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी एक किट तयार केलं आहे.

नॅशनल ऍग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (नाबी) या संस्थेतील डॉ.महेंद्र बिश्रोई, डॉ. कांती किरण कोंडपुडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हे किट विकसित केलं आहे. या किटची किंमत मात्र 50 रुपये असेल.

ज्या लोकांना ताप, सर्दी, खोकला अशी प्राथमिक लक्षणे दिसत नाहीत. अशा लोकांचीही तपासणी या किटमुळे होऊ शकते. कोरोनाचे संक्रमण झाल्यावर रुग्णांना गंध व चव कळत नाही. हे किट बनवण्यापूर्वी ऑनलाइन सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेद्वारे 5 गंध निवडण्यात आले जे की स्वयंपाकघर किंवा इतरत्र आपल्याला अनुभवयास मिळतात.

किटमध्ये पाच प्रकारच्या गंधांबरोबर एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या किटची व प्रश्नावलीची व्यवस्था अशी आहे की रुग्ण कोणतीही माहिती लपवू शकणार नाही किंवा खोटे बोलू शकणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

नव्वदीपार केलेल्या महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानी केली कोरोनावर मात

“सुशांत सिंहच्या खात्यातून गेल्या 90 दिवसात रियाने तब्बल इतके कोटी केले खर्च”

“अमित भाई, लवकरात लवकर बरे होऊन कोरोनाच्या या काळात आम्हाला मार्गदर्शन करावं”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामायणातील मंथरेसारखे; हनुमान गढी महंतांची टीका

गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; राहुल गांधी म्हणाले…