आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही कारण…- राज ठाकरे

मुंबई | महाविकास आघाडी सरकार बनल्यापासून भाजपने हे सरकार इतक्या महिन्यात पडणार, तितक्या महिन्यात पडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर काही सरकार अजूनतरी पडलं नाही. महाविकास आघाडीतील नेते मंडळी म्हणतात की आमचं सरकार पाच वर्ष टिकणार अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे सरकार पडणार असल्याचं म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या तीन पक्षांमध्ये एकोपा नाही. त्या सरकारमध्ये एकमेकांना विचारलं जात नाही. त्यामुळे ते सरकार फार काळ टिकणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलंच पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरूवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावंस वाटत नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

निष्ठावंतांना कात्रजचा घाट!; राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ‘या’ तरुणाची निवड?