स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नरेंद्र मोदींनी देशवासियांसाठी लाल किल्ल्यावरून केल्या मोठ्या घोषणा

नवी दिल्ली | भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं आहे. ध्वजारोहण पार पडल्यानंतर मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदींनी देशवासियांसाठी काही नवीन घोषणाही केल्या आहेत.

आजपासून भारतभर नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन चालू करण्यात येणार आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशननुसार प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ आयडी दिला जाईल. प्रत्येकाच्या या वैयक्तिक आयडीमध्ये त्याच्या आरोग्या संबंधित सर्व माहिती असेल. जसे की व्यक्तीची प्रत्येक मेडिकल टेस्ट, त्या व्यक्तीला झालेले आजार, डॉक्टरांनी दिलेली औषधं, मेडिकल रिपोर्ट्स हे सर्व या हेल्थ कार्डमध्ये असणार आहे, असं मोदींनी सांगितलं आहे.

कोरोना लसीविषयी बोलताना , भारतात एक दोन नाही तर तीन लसी प्रगतीपथावर असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच, देशातील आत्तापर्यंत दीड लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडल्याचं मोदींनी सांगितलं आहे. येत्या 1000 दिवसात सहा लाख गाव ऑप्टिकल फायबरशी जोडली जातील, असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, जम्मू कश्मीर आणि लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबवण्याचा दृष्टीने पाऊलं टाकली जात असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. तसेच जम्मू कश्मीर मधील लोकांना लवकरचं आपला मुख्यमंत्री, आपला आमदार मिळेल, असंही आश्वासन यावेळी मोदींनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकरामधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण; शरद पवारांच्या बैठकील होते हजर

स्वातंत्र्यदिनाला लागलं गालबोट! पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ, साताऱ्यातील खळबळजनत घटना

धक्कादायक! रक्षाबंधननंतर काही दिवसातच भावाने ज्याप्रकारे बहिणीचा खून केला ते ऐकून तुम्हीही व्हालं थक्क

“जे दिसतात ते सोबत नसतात, जे असतात दे दिसत नाहीत”

‘मेड इन इंडिया’ कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत कधी पोहोचणार?; नरेंद्र मोदी म्हणाले…